दोन दुचाकींच्या समोरासमोर धडकेत वृद्धाचा मृत्यू

चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील मिरजोळी ते विजापूर गुहागर रस्त्यावर साई मंदिर नजीक दोन दुचाकींमध्ये जोरदार धडक झाली. या अपघातात रामचंद्र शंकर पिंपळकर या वृद्धाचा मृत्यू झाला.

जैद लियाकत कोलथरकर हे आपल्या ताब्यातील होंडा कंपनीची ॲक्टीवा गाडी (क्र.एम.एच.०८ एव्ही- ७५५४ ) ही मिरजोळी गाव ते विजापुर गुहागर रस्ता साईमंदीर अशी अंतर्गत रस्त्याने भरधाव वेगाने चालवित येत होते. त्यावेळी प्रतीक प्रकाश पिंपळकर (30, सती भाग्योदय नगर, चिपळूण) यांचे ताब्यातील टिव्हीएस कंपनीची एंटर गाडी ( एम.एच. ०८ एसटी- ०३६८) या मोटर सायकलला जोरदार ठोकर दिली.या अपघात करुन फिर्यादीचे गाडीवर मागे बसलेले आजोबा रामचंद्र शंकर पिंपळकर (वय ८३ ) यांना अपघातात डोक्याला गंभीर मार लागुन त्यांचा मृत्यू झाला. ऍक्टिव्हा चालकविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.