देवरुख तालुक्यातील विहिरीत मृतावस्थेत आढळले १० डुक्कर

देवरुख:- देवरुख तालुक्यातील किरदाडी गावातील विहिरीत तब्बल १० डुक्कर मृतावस्थेत आढळले. मृत डुक्करांना बाहेर काढून त्यांच्यावर पुढील सोपस्कार करण्यात आले.

शुक्रवारी सकाळी संजय पेडणेकर यांच्या विहीतून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात आले. यानुसार विहिरीत पाहिले असता, विहित डुक्करांचा कळप मृतावस्थेत दिसून आला. ही बाब वनविभागाला कळवण्यात आली. वनपाल तौफीक मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक अरुण माळी यांनी घटनास्थळी भेट दिली. तपासणीत हे डुक्कर कळपाने जात असताना विहिरीत पडून पाच दिवसांपुर्वीच मृत झाल्याचे निष्पन्न झाले. ते कुजलेल्या स्थितीत होते. या सर्व मृत दहा डुक्करांचे शव ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढून त्यांचे दफन करण्यात आले.