रत्नागिरी:- दुचाकी चोरी प्रकरणात चोरट्याला न्यायालयाने चार महिने कारावासाची शिक्षा सुनावली. खेडशी, चांदसूर्या येथून दुचाकी चोरीला गेल्याची घटना 14 एप्रिल रोजी घडली होती. या प्रकरणी हेमंत मांडवकर (45, पानवल, घवाळीवाडी) यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली होती.
ग्रामीण पोलिसांनी हेमंत मांडवकर यांच्या तक्रारीनुसार चोरट्या विरोधात भादवी कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला होता. तपासामध्ये पोलिसांनी पवनकुमार उदय सिंग (24, हरियाणा) याला दुचाकी चोरल्या प्रकरणी अटक केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर दोषारोप पत्र ठेवण्यात आले. खटल्या दरम्यान 5 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाकडून अँड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. त्यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दुचाकी प्रकरणात पवनकुमार याला दोषी मानून 4 महिन्यांची साधी कारावासाची शिक्षा सुनावली. प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी संगीता वनकोरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. या खटल्यात मदतनीस म्हणून पोलिस हवालदार दुर्वास सावंत यांनी व पैरवी अधिकारी म्हणून हवालदार संजीवनी मोरे व सुनील आयरे यांनी काम पाहिले.