दुकानांच्या पाट्या मराठीत लावा

मनसेचे व्यापारी महासंघाला आवाहन

रत्नागिरी:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकार्‍यांनी गुरुवारी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गणेश भिंगार्डे यांची भेट घेत सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत व्यापारी बंधूनी लवकरात लवकर नियमात न बसणार्‍या सर्व दुकाने व आस्थापनांच्या पाट्या मराठीत कराव्यात असे आवाहन करण्यात आले. व्यापारी महासंघाचे तालुकाध्यक्ष निखिल देसाई हे ही यावेळी उपस्थित होते.

मराठी पाट्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या मुंबईतील व्यापारी संघटनांना फटकारत सर्वोच्च न्यायालयाने दोन महिन्यात पाट्या नियमांप्रमाणे मराठीत करा असा आदेशच दिला होता ही मुदत दि.२५ नोव्हेंबर रोजी समाप्त होत असून त्या पार्श्वभूमीवर मनसे तर्फे हे आवाहनपत्र देण्यात आले.ही मुदत संपल्यावर मनसेचे शहरातील नियमबाह्य पाट्यांवर विशेष लक्ष असेल असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी मनसे शहरअध्यक्ष अद्वैत कुलकर्णी, उपशहरअध्यक्ष गौरव चव्हाण, महिला उपशहरअध्यक्ष शिल्पाताई कुंभार विभागअध्यक्ष दिलीप नागवेकर, विभागअध्यक्ष सर्वेश जाधव, उपविभागअध्यक्ष ऋषिकेश रसाळ, शाखाध्यक्ष साहिल वीर, मनसे रस्ते आस्थापना तालुका संघटक सतिश खामकर, भाई साUवी आदी महाराष्ट्रसैनिक पदाधिकारी हजर होते.