दारूच्या नशेत पोलिसांसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

खेड:- तालुक्यातील धामणंद पंधरागाव विभागातील तळवटजावळी -कृष्णवाडी येथे दारूच्या नशेत पोलिसाशी गैरवर्तन केल्याप्रकरणी एकावर येथील पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

रूपेश रविंद्र सकपाळ (34, रा. तळवटजावळी- कृष्णवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. त्याने दारूच्या नशेत मी कोण आहे हे माहिती नाही, मी तुम्हाला दाखवतो, असे वक्तव्य करून पोलिसाशी गैरवर्तन केले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.