दापोली:- सकाळी कामावर गेलेला मुलगा जखमी अवस्थेत घरी आला असता त्याच्याकडे कुटुंबीयांनी चौकशी केली. मात्र आपण पडलो असल्याने तोंडाला मार लागला असल्याचे त्याने सांगितले. त्याला उपचाराकरीता दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कुटुंबीयांनी संशय व्यक्त केला असून याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर नेमका त्याचा मृत्यू कसा झाला याचा उलगडा होणार आहे
याबाबतची खबर वडील महादेव पांडुरंग बेर्डे (वय-76 वर्षे, व्यवसाय- शेती, रा. कर्दे, साकडेवाडी ता. दापोली) यांनी दिली असून मृत मुलाचे नाव दत्ताराम महादेव बेर्डे (वय 45 वर्षे, रा. कर्दे, साकडेवाडी ता. दापोली) असे आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक 24/01/2025 रोजी 17.45 वा. वा. चे दरम्याने उपजिल्हा रुग्णालय, दापोली ता. दापोली जि. रत्नागिरी येथे खबर देणार यांचा मुलगा दत्ताराम महादेव बेर्डे हा आज दि. 24/01/2025 रोजी सकाळी 06.30 वा. चे दरम्याने खबर देणार यांचा मुलगा दत्ताराम हा कामाकरिता बाहेर गेला होता व तो दुपारी 12.30 वा. चे दरम्याने घरी परत आला. मात्र त्यावेळी त्याचे तोंडाला मार लागला होता. कुटुंबीयांनी त्याबाबत त्याला विचारणा केली असता त्याने मी स्वतः पडलो आहे. त्यामुळे माझ्या तोंडाला मार लागला आहे असे सांगितले. त्यानंतर त्याचे तोंडावर सुज येवून लागल्याने वडिलांनी त्याला 04.30 वा. चे दरम्याने दापोली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले. त्यानंतर त्याची तब्येत अधिक बिघडली व सायंकाळी 05.45 वा. चे दरम्याने डॉक्टरांनी तपासुन तो मयत झालेचे घोषीत केले.
या घटनेचा तपास पोउनि श्री. पवार यांचेकडे देण्यात आला आहे. दत्ताराम महादेव बेर्डे याचा कोणाबरोबर वाद झाला होता का, किंवा अन्य कोणत्या कारणाने त्याला दुखापत झाली याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.