दापोली उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकेची आत्महत्या

दापोली:- दापोली उपजिल्हा रुग्णालयातील अधिपरिचारिकेने दापोली शहरातील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याने दापोली उपजिल्हा रुग्णालयात खळबळ उडाली आहे.

सोनी धोंडीराम पवार (वय ३०, मुळ गाव जालना ढोणवाडी ता. परतूर) असे युवतीचे नाव आहे. ही धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. रविवारी सायंकाळी ४.२५ वाजण्याचे पुर्वी ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणाची फिर्याद प्रियांका किसन बिरवटकर (अधिपरिचरिका) यांनी याची खबर दापोली पोलिसांना दिली आहे.

उपजिल्हा रुग्णालयात दुपारी ०२.३० वा. रिलीव्ह करणेकरिता सोनी धोंडीराम पवार येणार होती. ती न आल्याने महिला कर्मचारी तिच्या रूमवर गेले असता हा प्रकार उघडकीस आला. किचन रूम मध्ये तिने फॅनला पोपटी रंगाची नायलॉन दोरीने गळफास लावल्याची माहिती पोलिसांनी दिली. याची खबर तात्काळ दापोली पोलिसांना दिली.याप्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.