खेड:- खंडणीसाठी ठेकेदारांवर खुनी हल्ला केल्याप्रकरणी दापोली पोलीस सरपंच रवींद्र सातनाक यांचा जामिनअर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.
दापोली पोलिसांनी सरपंच रवींद्र सातनाक (रा. आडे पाडले, तालुका दापोली) यांना अटक करून भारतीय दंड विधान कलम 307 नुसार गुन्हा दाखल केला होता. सरपंच सातनाक यांच्यावर आरोप होता की त्याने चाकूच्या साह्याने फिर्यादीवर तो काम करत असताना चाकुने वार केला होता. फिर्यादीने आरोप केला की संशयित खंडणी मागत होता. त्याने खून करण्याचा प्रयत्न केला त्यांनी एकूण दोन वार केले पैकी दोन्ही वर चुकवले तरी देखील छातीवर एक जखम झाली व खांद्यावर एक जखम झाली. संशयिताला खेड न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कस्टडी दिली फिर्यादी तर्फे ॲड. सुधीर बुटाला व ॲड. समीर शेठ यांनी काम पाहिले.
या प्रकरणी सरपंच सातनाक यांने जिल्हा न्यायालय येथे जामीन करता अर्ज केला परंतु त्या जामीन अर्जला सरकारी वकील समीर शेठ यांनी विरोध केला सरकारी वकीलाचा युक्तिवाद ग्राह्य धरून संशयित सातनाक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे.