रत्नागिरी:- कोकण रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलेची चोरट्याने पर्स पळविली. या पर्स मध्ये रोख रक्कम, मोबाईल व दागिने असा ७५ हजाराचा मुद्देमाल होता. अज्ञाताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (ता. ५) सकाळी सातच्या सुमारास प्रवासात रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राघवेंद्र श्रीधर कनयाळकर (वय ७८, रा. सोनी पॅराडाईज राम मंदिर रोड, वजिरा, बोरीवली पश्चिम-मुंबई) हे पत्नीसह दादर मुंबई येथून सावंतवाडी येथे जाण्यासाठी रेल्वेच्या तुतारी एक्स्प्रेसने जात असताना पत्नीने पर्स डोक्याखाली घेऊन झोपल्या होत्या. रात्री झोपेचा फायदा घेऊन चोरट्याने रत्नागिरी रेल्वे स्टेशन दरम्यान त्यांच्या उशाखाली ठेवलेली पर्स पळविली. त्यामध्ये दोन मोबाईल, १५ हजार रोख व ७५ ग्रॅम दागिने असा ७५ हजाराचा मुद्देमाल होता. या प्रकरणी राघवेंद्र कनयाळकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.