ताशा वादकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरणार्‍या टेम्पो चालकावर गुन्हा

रत्नागिरी:- टेम्पोची देखभाल न करता हयगयीने चालवून गणपती विसर्जनावेळी पुढील ताशा वादकाला धडक देत अपघात केला. उपचारांदरम्यान कोल्हापूर येथे सुभाष हरिश्चंद्र कुळ्ये (52) या ताशा वादकाचा मृत्यू झाल्याप्रकरणी चालकाविरोधात 15 ऑक्टोबर रोजी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा अपघात 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा.कारवांचीवाडी येथे घडला होता.

प्रकाश लक्ष्मण जोशी असे गुन्हा दाखल करण्यता आलेल्या टेम्पो चालकाचे नाव आहे.28 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वा.प्रकाश जोशी आपल्या ताब्यातील आयशर टेम्पो (एमएच-08-एच-2556) मधून गणपतीच्या मुर्त्या ठेवून कारवांचीवाडी येथील कुळ्येवाडी येथील मिरवणूकीत होता.त्यावेळी हयगयीने टेम्पो चालवल्यामुळे तेसेच टेम्पोचे ब्रेक न लागल्यामुळे टेम्पो पुढील ढोल ताशा वादकांना त्याने धडक दिली.यात सुभाष कुळ्ये यांना गंभिर दुखापत झाल्याने त्यांना प्रथम खासगी हॉस्पिटलमध्ये नेउन अधिक उपचारांसाठी कोल्हापूर येथील अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.परंतू उपचारांदरम्यान 9 ऑक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.