ताम्हाणेत बंदूक बाळगणाऱ्या प्रौढाला अटक

रत्नागिरी:- सहा जिवंत काडतुसांसह सिंगल बॅरेल बंदूक बाळगणाऱ्या संगमेश्वर येथील ताम्हाणे गावातील प्रौढाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांचे पथकाने अटक केली.

स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी यांचे पथकाने दि. ०४/०१/२०२५ रोजी गोपनीय बातमीच्या आधारे हि कारवाई केली. संगमेश्वर ते देवरूख जाणारे रोडवरील ताम्हाणे गावी संदीप शांताराम रेवाळे, वय ४८ वर्षे, रा. ताम्हाणे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी याचयाकडे काही शस्त्र असलायची माहिती मिळाली होती. पथकाने छापा टाकला तेव्हा संदीप रेवाळे याच्या ताब्यातुन १ सिंगल बॅरल काडतूसची बंदुक व ६ जिवंत काडतुसे तसेच ३ वापरलेली काडतूसे असा एकुण ३६,८००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी देवरूख पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक स्थागुअशा रत्नागिरी, पोऊनि शेषराव शिंदे, पोहवा सुभाष भागणे, बाळू पालकर, प्रविण खांबे, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे, स्थागुअशा रत्नागिरी, यांनी केलेली आहे.