रत्नागिरी:- रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने सोमवार 16 ऑक्टोबर पासून दोन्ही जिह्यातील तलाठी / मंडळ अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे, अशा सर्व कार्यालयाच्या चाव्या पत्येक तालुक्याचे तहसीलदार यांचेकडे जमा केल्या आहेत. या आंदोलनामुळे जिल्ह्यातील नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून ग्रामीण स्तरावरील तलाठी कार्यालयामार्पत होणारी कामांचा खोळंबा झालेला आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून या चाव्या तहसीलदार यांच्याकडे जमा केल्dया आहेत. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाणार असल्याचे तलाठी संघाने इशारा दिला आहे. संपूर्ण राज्यात सध्या ई-फेरफार, ई-चावडी, ई-पीक पाहणी व ई- हक्क प्रणालीमध्ये कामकाज सुरू आहे. या प्रणालीमध्ये काम करत असताना तलाठी / मंडळ अधिकारी यांना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. जिल्हा संघाने सन 2016 पासून वेळोवेळी या प्रणालीमध्ये येणाऱया अडचणी निवेदनाद्वारे त्या त्या ^ठिकाणच्या तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, जमाबंदी आयुक्त व शासन दरबारी मांडलेल्या आहेत.
त्या अडचणी सोडविण्यासाठी योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने संघाला नाईलाजाने आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली आहे, असे रत्नागिरी, सिंधुदुर्ग तलाठी संघाच्यावतीने सांगण्यात आले आहे. एखाद्या प्रणालीचे गुणात्मक प्रदर्शन जाणीवपूर्वक दुर्लक्षित करुन केवळ मला माझा वरिष्ठ अधिकारी जाब विचारतो किंवा आढावा घेतो, म्हणून दबाव टाकून तलाठी संवर्गामध्ये स्पर्धा लावून काम करुन घेण्यावर अधिकारी वर्गाकडून भर दिला जात आहे, या धोरणाला / काम करुन घेण्याच्या दडपशाही मार्गाच्या कार्यपध्दतीला तलाठी संघाचा विरोध आहे.
रत्नागिरी तलाठी संघाकडून विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिह्यांमध्ये तलाठ्यांची सुमारे 50 टक्के पदे रिक्त आहेत. त्यांच्याकडून अतिरिक्त सजांची जबाबदारी देण्यात आली आहे. त्या सर्व तलाठी, मंडळ अधिकाऱयांनी पहिल्या टप्प्यातील अतिरिक्त सजांच्या चाव्या त्या त्या तालुक्यांच्या तहसिलदारांकडे जमा केल्या आहेत. तलाठी संघातर्फे आपल्या 26 मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे जिल्ह्यातील नागरिकांची तलाठी कार्यालयात होणाऱया कामे खोळंबली असल्याचे चित्र आहे.