संगमेश्वर:- मुंंबई-गोवा महामार्गावरील कुरधुंडा येथे डंपर व इर्टिका कार यांच्यात झालेल्या अपघातात 8 प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.
कार चालक महेंद्र भरणे हा आपल्या ताब्यातील कार घेवून रत्नागिरीच्या दिशेने जात होता. याच दरम्यान चौपदरीकरण कामातील डंपर चालक वाहिद मिया (झारखंड) हा आपल्या ताब्यातील डंपर घेवून जात असताना कारला विरुध्द दिशेला जावून जोरदार धडक दिली. हा अपघात एवढा मोठा होता की या अपघातात कारचा चक्काचूर झाला. तर आतील 8 प्रवासी जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस स्थानकाचे पोलीस शिंदे, वर्षा कोष्टी, पोलीस कॉन्स्टेबल देशमवाड, पोलीस आव्हाड हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कारमधील जखमींना त्वरित संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमींमध्ये ज्ञानेश्वर खांडेकर, आयुष मोरे, सविता खांडेकर, आदिनाथ मोरे, रिया मोरे, अर्चना धावडे, सुमान खांडेकर, आदिती मोरे (सर्व रा. खेड) अशी जखमी प्रवाशांची नावे आहेत.
या अपघाताची नोंद संगमेश्वर पोलीस स्थानकात करण्यात आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस शिंदे करत आहेत.