रत्नागिरी:- दोन दिवसांपूर्वी कारवांचीवाडी येथे ट्रक-रिक्षा अपघातात मृत्युमुखी पडलेला तरुण रिक्षा चालक नसून मच्छी व्यावसायिक तरुण असल्याची माहिती समोर आली आहे.
शहरानजीकच्या कारवांचीवाडी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला रिक्षाने पाठीमागून धडक देत अपघात केला.यात एका तरुणच मृत्यू झाला असून रिक्षेतील दोन जखमी प्रवाशांना उचारांसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अपघाताची ही घटना मंगळवारी सकाळी 5.15 वा.सुमारास घडली होती. मृत तरुणाचे नाव दीपक दत्ताराम मांडवकर (29, रा. कोकरे, चिपळूण) असे आहे. तर रिक्षाचालक संदेश मांडवकर असे आहे. मृत तरुण हा मच्छी व्यावसायिक असून मच्छी आणण्यासाठी रत्नागिरी मिरकरवाडा येथे जात असताना हा अपघात झाला. रिक्षा डाव्या बाजूला ट्रकवर आदळली. दीपक हा रिक्षात डाव्या बाजूला बसला होता. रिक्षा डाव्या बाजूला जोरात आदळल्याने दीपक याचा या अपघातात मृत्यू झाला.