खेड:- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात मालवाहू ट्रक वळणावरील संरक्षक भिंतीवर आदळून ३१ जानेवारी रोजी झालेल्या अपघातात जखमी झालेल्या क्लिनर राजेशकुमार (१९) याचा सोमवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालक शेख अहेमद पीता मकदूम साब (५३) याच्यावर सोमवारी सायंकाळी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ट्रकचालक शेख साब हा एमएच ०९ सीव्ही ९३५६ क्रमांकाच्या मालवाहू ट्रकमध्ये लाद्या भरून कर्नाटक येथून महाड येथे येत होता. भोस्तें घाट उतरत असताना त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने वळणावरील संरक्षक भिंतीवर आदळला होता. यात टकमधील लाद्या इतरस्त्र पसरून क्लिनर टकच्या केबिनमध्ये अडकला होता. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या बाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल ए.बी. शेख यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.