ट्रक अपघात प्रकरणी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल

रत्नागिरी:- दारुच्या नशेत निष्काळजीपणे ट्रक चालवताना ट्रकवरील ताबा सूटल्याने चढावात ट्रकवर आदळून अपघात केला.अपघाताची ही घटना गुरुवार 22 डिसेंबर रोजी रात्री 9.30 वा.मुंबई-गोवा महामार्गावरील रामभोळकरीन देवस्थानच्या समोरील रस्त्यावर घडली.

किरण रावसाहेब पवार (29,रा.बार्शी,सोलापूर) याच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याच्याविरोधात प्रशांत श्रीकृष्ण ठावरे (37,रा.उद्यमनगर,रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,गुरुवारी रात्री ते आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच-08-डब्ल्यू-8502) घेउन हातखंबा ते निवळी असा येत होता.तेव्हा त्यांच्या पुढे किरण पवार हा आपल्या ताब्यातील ट्रक (एमएच -10-एडब्ल्यू- 7978) घेउन जात असताना त्याचा ट्रकवरील ताबा सूटला आणि ट्रक मागे आल्याने ठावरे यांच्या ट्रकवर आदळून हा अपघात झाला होता.याप्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत