रत्नागिरी:-तालुक्यातील झरेवाडी येथील बंद घरे फोडून अज्ञाताने सुमारे १५ हजार रूपयांचे चांदीचे दागिने लांबविले. या प्रकरणी ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना १३ एप्रिल ते १७ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या कालावधीत घडली आहे. लालासो मारूती पवार (रा. झरेवाडी, रत्नागिरी) यांनी याबाबत ग्रामीण पोलीस स्थानकात खबर दिली.
दि. १३ एप्रिल रोजी लालासो पवार घर बंद करून काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. दि. १४ एप्रिल रोजी सकाळी ७.३० वाजता घरी परतले असता त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे लॉक कोणत्यातरी हत्याराने तोडलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यामुळे त्यांनी घरात जावून पाहिले असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच कपाटातील चांदीचे पैंजण, जोडवी आणि इतर दागिने असा एकूण १५ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत अधिक तपास ग्रामीण पोलीस करीत आहेत.