रत्नागिरी:- रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार शिवसेनेमार्फत आपला उमेदवारी अर्ज आज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे भरणार आहेत. त्यापूर्वी खा.राऊत रत्नागिरी शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीमार्फत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. दि.12 एप्रिलपासून 19 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. खा.राऊत यांनी आज मंगळवारचा उमेदवार साधला असून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खा.राऊत मराठा भवन येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.
मराठा भवन येथे सकाळी 11.30 वाजता होणाऱ्या सभेला शिवसेनानेते आ.भास्करशेठ जाधव, माजी मंत्री रवींद्र माने, माजी आमदार सुभाष बने, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम यांच्यासह सर्व तालुकाप्रमुख, महिला पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. याच नेत्यांच्या उपस्थितीत खा.राऊत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.