जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट;  24 तासात 331 कोरोना बाधित

रत्नागिरी:-जिल्ह्यात चोविस तासात 331 तर त्या अगोदरच्या 49  कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नवे 380 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 61 हजार 022 वर गेली आहे. जिल्ह्यात आज 5 मृत्यूंची नोंद झाली आहे तर जिल्ह्यात तब्बल 741 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात मागील चोवीस तासात कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहे. गेले काही दिवस रुग्णसंख्या नियमितपणे 500 च्या दरम्यान येत होती. जिल्ह्यात मागील 24 तासात 5 हजार 398 चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात 331 जण बाधित सापडले आहेत. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 7.43 टक्क्यांवर पोहचला आहे. आरटिपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 604 पैकी 236 तर अँटीजेन चाचणी केलेल्या 1 हजार 850 पैकी 95 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आज 741 जण बरे झाले असून आतापर्यंत एकूण 53 हजार 574 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

जिल्ह्यात 24 तासात 5 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 738 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्याचा मृत्यूदर 2.85 टक्के आहे. जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू रत्नागिरी तालुक्यात आतापर्यंत 564 मृत्यू, चिपळूण 343, संगमेश्वर तालुक्यात 151, खेड तालुक्यात 166 मृत्यू झाले आहेत. सर्वात कमी मृत्यू मंडणगड तालुक्यात केवळ 24 झाले आहेत.