रत्नागिरी:-जिल्ह्यात नव्याने 507 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तर 6 हजार 624 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 13 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नव्याने 507 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या 59 हजार 563 इतकी झाली आहे. बुधवारी 6 हजार 642 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आता पर्यंत 3 लाख 45 हजार 247 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 24 तासात 147 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. आता पर्यंत 51 हजार 309 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण 86.14 टक्के आहे.
नव्याने 507 रुग्ण सापडले असून यापैकी आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 2 हजार 482 पैकी 227 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 2 हजार 862 पैकी 166 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 24 तासात 5 हजार 963 चाचण्या करण्यात आल्या असून यापैकी 507 जण पॉझिटिव्ह सापडले असून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 7.35% आहे.