रत्नागिरी:- जिल्ह्यात नव्याने 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यापैकी 24 तासातील 2 तर यापूर्वीचे 2 मृत्यू आहेत. 24 तासात नव्याने 93 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत.
नव्याने 93 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 74 हजार 974 इतकी झाली आहे. 24 तासात 189 रुग्ण उपचाराअंती कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 71 हजार 184 रुग्ण बरे झाले आहेत.
जिल्ह्यात नव्याने 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृृृत 4 पैकी 24 तासातील 2 तर त्यापूर्वीचे 2 असे 4 मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 249 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 746 तर संस्थात्मक विलीकरणात 448 रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात लक्षण असलेले 1 हजार 206 तर लक्षण असलेले 273 असे एकूण 1 हजार 479 रुग्ण उपचार घेत आहेत.