जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या शुन्यावर

रत्नागिरी:- शुक्रवारी आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 450 तपासण्या करण्यात आल्या. यात एकही पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेला नाही. नव्याने एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत केवळ 7 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात एकही रुग्ण कोरोनामुक्त झाला नसून आतापर्यंत 81 हजार 915 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण  96.99 टक्के आहे. नव्याने पॉझिटिव्ह रुग्ण न सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 84 हजार 456 इतकीच आहे. 

जिल्ह्यात कोरोनाने  आतापर्यंत 2 हजार 534 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलीगिकरणात 3 तर संस्थात्मक विलीगिकरणात 4 रुग्ण उपचार घेत आहेत.