जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या घटतीच; 24 तासात सापडले 315 रुग्ण 

रत्नागिरी:-जिल्ह्यात सापडणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू कमी होऊ लागली आहे. जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 315 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यातील 105 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 210 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 24 तासात 1491 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. नवे 315 रुग्ण सापडल्याने जिल्ह्याची रुग्णसंख्या 33 हजार 554 झाली आहे. दरम्यान 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात  बुधवारी 343, गुरुवारी 339, शुक्रवारी 450 तर शनिवारी 372, रविवारी 402, सोमवारी 393 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 315 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 105 रुग्ण आरटीपीसीआर तर 210 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत.  जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 33 हजार 554 वर जाऊन पोहचली आहे. 

मागील 24 तासात 1491 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यात आरटीपीसीआर चाचणी केलेल्या 301 जणांपैकी 196 निगेटिव्ह तर अँटीजेन टेस्ट केलेल्या 1505 पैकी 1295 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले आहेत. मागील चोवीस तासात 12 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 1110 जणांचा कोरोनाबळी गेले आहेत.