रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात जिल्ह्यात 416 नवे पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. मागील दोन दिवसांपासून रुग्णसंख्य पाचशेच्या खाली असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. नव्याने सापडलेल्या 416 रुणांपैकी 190 रुग्ण हे आरटीपीसीआर चाचणी केलेले आहेत तर 226 रुग्ण अँटीजेन चाचणी केलेले आहेत. 416 नव्या रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढून 35 हजार 042 झाली आहे.
मागील 24 तासात 11 रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नव्याने झालेल्या 11 मृत्यू पैकी रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 8 मृत्यू आहेत. याशिवाय गुहागर 2 आणि राजापूर तालुक्यात एका मृत्यूची नोंद आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 169 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून सर्वाधिक 342 मृत्यू रत्नागिरी तालुक्यात झाले आहेत. चिपळूण तालुक्यात 231, खेड 122, गुहागर 64, दापोली 103, संगमेश्वर 149, लांजा 63, राजापूर 83 आणि मंडणगड तालुक्यात 12 मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यातील मृत्यूदर 3.33% आहे.
जिल्ह्यात बुधवारी 343, गुरुवारी 339, शुक्रवारी 450 तर शनिवारी 372, रविवारी 402, सोमवारी 393 तर मंगळवारी 315, बुधवारी 635, गुरुवारी 437 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले होते. हाती आलेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात 416 नवे रुग्ण सापडले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 190 रुग्ण आरटीपीसीआर तर 226 रुग्ण अँटीजेन चाचणीत बाधित सापडले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 35 हजार 42 वर जाऊन पोहचली आहे.