जिल्ह्यात 24 तासात 200 नवे कोरोना बाधित; 4 मृत्यूची नोंद

रत्नागिरी:- मागील 24 तासात 200 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर 4 रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 

नव्याने 200 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 72 हजार 76 इतकी झाली आहे. जिल्ह्यात 72 हजार 76 रुग्णाांपैकी 67 हजार 651 रुग्ण बरे झाले आहेत.  24 तासात 181 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. 

जिल्ह्यात आज 4 मृत्यूंची नोंद झाली असून गेल्या 24 तासातील 2 आणि त्यापुर्वीच्या 2 मृत्यूंचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण 2 हजार 105 जणांच्या मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात मृत्यूचे प्रमाण 2.92% आहे.