जिल्ह्यात 100 नवे पॉझिटिव्ह; रत्नागिरी तालुक्यात सर्वाधित 79 रुग्ण 

तिघांचा मृत्यू, मृत्यूसंख्या 105 वर 

रत्नागिरी:- जिल्ह्यात मागील 24 तासात ऍ़न्टीजेन चाचणीत 57  तर  आरटीपीसीआर चाचणीत 43 असे एकूण 100 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2945 इतकी झाली. तर तीन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोनाने मृत्यूसंख्या 105 इतकी झाली आहे. 

नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीत 79, संगमेश्वर 7, गुहागर 2, देवरुख 2, घरडा रुग्णालय 10असे एकूण 100 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.

आज नाचणे, रत्नागिरी येथील 72 वर्षीय कोरोना रुग्णाचा तसेच  दापोली येथील 64 वर्षीय कोरोना रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. तसेच  कर्टेल, खेड येथील ऍ़न्टीजेन टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या 68 वर्षीय कोरोना रुग्णाचा  16 ऑगस्ट रोजी मृत्यू  झाला.  त्यामुळे एकूण मृत्यू संख्या आता  105 झाली आहे.