जिल्ह्यात 1 हजार 250 अहवालांमध्ये केवळ 2 पॉझिटिव्ह रुग्ण 

रत्नागिरी:- नव्याने आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यात 1 हजार 250 अहवालांमध्ये केवळ 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. 24 तासात एकाही रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झालेला नाही. जिल्ह्यात सद्यस्थितीत 30 रुग्ण उपचारखाली आहेत. 

जिल्ह्यात 24 तासात एक रुग्ण कोरोनामुक्त झाला असून आतापर्यंत 76 हजार 614 रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढून  96.82 टक्के आहे. नव्याने 2 पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने एकूण बाधित रुग्णसंख्या 79 हजार 1248 इतकी झाली आहे. 

 जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 490 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्याचा मृत्युदर 3.15 टक्के आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात 10 तर संस्थात्मक विलगीकरणात 20 रुग्ण उपचार घेत आहेत.