रत्नागिरी:- जिल्हा निवड समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकाऱ्यांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी तयार करुन जिल्हा परिषदमध्ये हजर होण्यासाठी गेलेल्या तरूणाला अटक केल्यानंतर आता या प्रकरणाचा मास्टरमाईंड राजकीय पक्षाचा माजी पदाधिकारी अंजिक्य नाईक असल्याचे उघड झाले आहेत. त्यानेच एक लाखात त्याला बनावट नियुक्तीपत्र दिले होते.अंजिक्य नाईक (२८ रा.एकता अपार्टमेंट) ला शहर पोलीसांच्या पथकाने अटक केली असून त्याच्यासह सौरभ पवार याला पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
बनावट नियुक्ती पत्राच्या आधारे कनिष्ठ प्रशासक अधिकार्यांकडे हजर होण्यासाठी गेलेल्या सौरभ किशोर पवार (रा. केळवी, ता.राजापूर,जि.रत्नागिरी) शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीसांनी त्याला अटक केली होती.
कनिष्ठ प्रशासक अधिकारी बालाजी विठ्ठलराव कलेटराव (४७,रा.रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार,सौरभ पवार याने जिल्हा निवड समिती अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी यांचा बनावट शिक्का व स्वाक्षरी तसेच जिल्हा परिषद,रत्नागिरीचाही बनावट शिक्का व स्वाक्षरीव्दारे बनावट नियुक्ती पत्र तयार केले.ते नियुक्ती पत्र कनिष्ठ प्रशासक अधिकारी कलेटराव यांच्याकडेन देवून तो हजर होण्यासाठी गेला होता. यावेळी हा घोटाळा उघड झाला होता.
सौरभची चौकशीकेल्यानंतर त्याने आपला नातेवाईक असलेल्या अंजिक्य नाईकने आपल्याला एक लाख रु. घेवून शासकिय नोकरीचे नियुक्ती पत्र दिल्याचे पोलीसांच्या चौकशीत सांगितले होते. त्यानंतर पोलीसांनी त्याची खातरजमाकरुन गुरुवारी अंजिक्य नाईकला अटक केली आहे. त्याने जिल्हाधिकार्यांचा बनावट शिक्का, सही करुन सौरभला नियुक्ती पत्र दिल्याचे चौकशीत पुढे आले आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.अंजिक्य नाईकने अशा किती जणांना नियुक्ती पत्र देवून त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. हे पोलीसांच्या चौकशीत उघड होणार आहे.