जिल्हा रुग्णालयात उभारले जाणार दोन अत्याधुनिक आयसियु विभाग

रत्नागिरी:- ठाणे महापालिकेच्या कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्री १७ रूग्णांचा मृत्यू झाल्याने राज्यात खळबळ उडाली. या अनुषंगाने जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता (आयसीयु) विभागाची परिस्थिती तशी चांगली म्हणावी लागेल. मुख्य अतिदक्षता विभागात १८ खाटा, तर लहान मुलांच्या १२ खाटांचा अतिदक्षता विभाग आहे. रुग्णालय मोठ्या माणसांचे आणखी ५० खाटांचे तर छोट्या मुलांचे ४२ खाटांचे नवीन दोन आधुनिक आयसीयु विभाग उभारण्यात येणार आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांच्या आरोग्याची जिल्हा रुग्णालयात काळजी घेतली जाणार आहे. सुमारे एक कोटीचा हा प्रकल्प आहे.

ठाणेतील घटनेने संपुर्ण महाराष्ट्र हादरला. यावरून विरोधकांनी रान उठवले असून अनेक आरोप होत
आहेत. या प्रकरणाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समितीमार्फत चौकशी लावली आहे. या पार्श्वभुमिवर
रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाची माहिती घेतली असता काहीसे समाधानकारक बाबी
पुढे आल्या. रुग्णालयाच्या आयसीयुमध्ये गेलेला माणून परत येत नाही, असेही उपहासात्मक बोलले जाते. त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयुबाबतही चांगले मत आहे, असे नाही. रुग्णालयात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात रुग्ण दाखल होतात. परंतु त्या तुलनेत जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. त्याचा परिणाम रुग्ण सेवेवर होतो. त्यामुळे रुग्णालयाबाबत तक्रारी वाढल्या आहेत.

जिल्हा रुग्णालयात सध्या १८ आयसीयु खाटा आहेत. तर लहान मुलाचे १२ खाटांचे स्वतंत्र आयसीयु आहे. अत्याधुनिक उपकरणांचा त्यामध्ये समावेश आहेत. त्यामुळे दोन्ही आयसीयुमधील रुग्णांना चांगली
सेवा दिली जाते, असे रुग्णालय प्रशाससनाकडुन सांगितले जाते. रुग्णालयात आणखी आयसीयु उभारली जाणार आहेत. ही आयसीयु महिला रुग्णालयात होणार होती. परंतु महिला रुग्णालयाची इमारत वैद्यकीय महाविद्यालयासाठी वापरील जात असल्याने ते दोन्ही आयसीयु जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. एमरजन्सी कोविड रिलिफ फंडातून याला निधी मिळाला आहे. एका खाटेला साधारण एक लाख रुपये खर्च अपेक्षित असतो. असे सुमारे एक कोटीचा निधी या दोन्ही आयसीयुवर खर्च केला जाणार आहे. मोठ्या माणसांचे ५० खटांचे तर लहा मुलांचे ४२ खाटांचे अत्याधुनिक आयसीयु विभाग असणार आहेत. त्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांचीही जिल्हा रुग्णलयात काळजी घेतली जाणार आहे. आयसीयुमध्ये खाट रिकमी नाही, म्हणून खासगी किंवा अन्य रुग्णालयात हलविण्याची गरज भासणार नाही. परंतु त्यासाठी लागणाऱ्या प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा प्रश्न गंभीर आहे.