जागा मोबदल्याबाबत शिरगाव- तिवंडेवासियांच्या पाठीशी 

बैठकीत खासदार राऊत यांच्याकडून आश्वासन 

रत्नागिरी:- रत्नागिरी विमानतळ व कोस्टगार्ड कार्यालयासाठी केल्या जाणाऱ्या भुसंपादन मोबदल्याबाबत शिरगाव तिवंडेवासियांनी रत्नागिरी-सिंधुदूर्गचे खासदार विनायक राउत यांची भेट घेण्यात आली. या भूसंपादनाबाबत योग्य मोबदला देण्यासाठी  प्रयत्नशील राहणार असल्याचे आश्वासन राउत यांनी दिले. 
   

कोस्टगार्डच्या विमानतळासाठी शिरगाव परिसरातील जमिनींचे भूसंपादन करताना मुख्यत्वे तेथील मिळकतीचा रेडीरेकनर रेट रु. 5732 (अंदाजे) बाबत जो अगदी कमी पमाणात देण्यात येणार आहे. ही बाब शिरगांव तिवंडेवाडी वासियांनी निदर्शनास खासदार विनायक राउत यांना दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी येथे आणून दिले. भूसंपादनाबाबत येथील ग्रामस्थांवर मोबदला देताना अन्याय होणार नाही या सर्व गोष्टींचा योग्य तो विचार करावा याबाबत निवेदनही दिले. मोजे तिवंडेवाडी येथील जमिन विमानतळ व कोस्टगार्ड साठी भुसंपादनासाठी नक्की होत आहे. त्या मिळकती म्हणजे मौजे तिवंडेवाडीतील मिळकती ह्या हातखंबा ते मिऱयाबंदर कोस्टल हायवेला लागूनच आहेत. खर तर हा हायवे शिरगांव मधूनच जातो व हायवेच्या दोन्ही बाजूस शिरगांव आहे. आमच्या मिळकतींचा रेडीरेकनाचा वरकस मिळकतीचा दर हा सुमारे रु. 5732 प्रति गुंठा प्रमाणे दिला जाणार असल्याचे निवेदनाद्वारे म्हटले आहे. पण प्रत्यक्षांत कोस्टल हायवेच्या शिरगांव भागातच उद्यमनगर कडे जमिनी सुमारे 10 ते 11 लाख रुपये गुंठा आहेत. तिथून पुढे गोडबोले स्टॉपकडे 25 ते 30 लाख रुपये गुंठा असल्याचा फरक दाखवून देण्यात आला असल्याचे म्हणणे आहे.   

 केंद्राच्या अन्य प्रोजेक्टप्रमाणे, महामार्ग चौपदरीकरण भूसंपादन दराप्रमाणे येथेही दर देण्याचे गरजेचे असल्याचे म्हणणे मांडण्यात आले आहे.  कोस्टगार्ड हा देखील केंद्राचाच प्रोजेक्ट आहे व असे सुधारीत दर भारतात सर्वत्र देणेत आले आहेत. ग्रामस्थाना समाधानकारक योग्य तो दर मिळाला तरच स्वखुशीने जमिनी देण्यास शिरगांववासीय तयार आहेत. तसेच पकलपग्रस्त म्हणून ग्रामस्थांच्या म्हणण्याप्रमाणे प्रकल्पबाधित प्रमाणपत्र ग्रामस्थांना मिळायला हवे अशी मागणी शिरगाव तिवंडेवाडीवासियांच्यावतीने खासदार विनायक राउत यांच्याकडे करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना जिल्हा सहसंपर्पपमुख राजेंद्र महाडिक, तसेच तिवंडेवाडी येथील दिपक सनगरे, सुरेश ठीक, नारायण सनगरे, रवी घडशी, विश्वास ठीक, अनंत सनगरे, व तिवंडेवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.