रत्नागिरी:- शहरातील जलतरण तलाव येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या दोघा संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विराज सुधाकर खानिवलकर (वय ३६, रा. यश अपार्टमेंट, पॉवर हाउस, रत्नागिरी) व सिद्धराज शरद रेडीज (वय ३६, शिवाजीनगर, रत्नागिरी) अशी संशयितांची नावे आहे. या घटना शनिवारी (ता. १) रात्री सात ते आठच्या सुमारास एका वाईन मार्टच्यासमोर जलतरण तलाव येथे निदर्शनास आल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित जलतरण तलाव येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना पोलिसांच्या निदर्शनास आले. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमित पालवे व पोलिस हेड कॉन्स्टेबल अशिष भालेकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.