रत्नागिरी:- चिपळूण तालुक्यातून तब्बल 26 लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली असून या प्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दशरथ कांबळे यांनी या प्रकरणी पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार मुस्ताक जिकर कच्छी (रा. चिपळूण) आणि अंकुश सुनील केसरकर (26, रा. बांदा पोलीस स्टेशन नजिक) आणि संदीप भैरू पाटील (रा. इन्सुलि पागावाडी) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कांबळे हे अन्नसुरक्षा अधिकारी आहे. आरोपी यांनी त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र.एमएच -07/ एक्स / 0862) मधुन एकुण 26 लाख 9 हजार 150 रुपये रक्कमेचा तंबाखु , पान मसाला, गुटखा आयशर टेम्पो व मारुती इको कार मधुन आणला. यातून घातक परिणाम होवुन जिवीतास धोका निर्माण होतो याबाबत माहिती असुनही शासनाने प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा पुरवठा वाहतुक वितरण व विक्री करत असताना फिर्यादी यांना मिळुन आला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.