घरगुती कारणातून वृध्दाची आत्महत्या

संगमेश्वर:- तालुक्यातील असावे बौद्धवाडी येथील सुनील सखाराम मोहिते (वय ५९) या व्यक्तीने न मद्यधुंद अवस्थेत सुनेशी वाद घातला. सुरीने मारण्यासाठी केलेल्या झटापटीत वे तिला सुरी लागून ओरखडा उठला. या वादाची तक्रार पोलिसांत जाईल, या भीतीने सुनील यांनी गळफास घेत आत्महत्या केली.

याबाबतची अधिक माहिती अशी की, संगमेश्वर तालुक्यातील असावे , बौद्धवाडी येथील सुनील सखाराम मोहिते हा व्यसनी होता. त्याने मद्यपान करून सुनेबरोबर वाद घातला. यावेळी भाजी कापण्याची सुरी हातात घेऊन तो सुनेच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला. या झटापटीत सुरीचे टोक निकिता हिच्या गालावर लागून ओरखडा उठला. याची तक्रार मुलगा निकेश आणि त्याची पत्नी पोलिसात करणार होते. या भीतीने सुनील याने १३ एप्रिलच्या रात्री ११:३० ते १४ एप्रिल पहाटे पहाटेच्या दरम्याने घरासमोरील पडवीतील लाकडी वाशाला गळफास घेत आत्महत्या केली. याची फिर्याद निकेत याने संगमेश्वर पोलिसांत केली आहे.