रत्नागिरी:- शेजारच्या मुलीबरोबर खेळताना तीन वर्षाच्या लहान मुलीच्या अंगावर गरम पाणी पडल्याने ती भाजली. तत्काळ उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र वांद्री-संगमेश्वर येथे दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.
ओवी अमर किंजळे ( वय ३, रा. वांद्री-संगमेश्वर) असे मृत मुलीचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. ११) सायंकाळी सहाच्या सुमारास जिल्हा रुग्णालय येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार ओवी शनिवारी शेजारच्या लहानमुलीबरोबर खेळत असताना तिच्या अंगावर गरम पाणी पडले. तात्काळ आईवडिलांनी उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले होते. तिची तब्बेत खालवली म्हणून रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.