क्वालिटी फॅक्टरी फोडून ३० हजारांचा ऐवज लंपास

खेड:- खेड ते अलसुरे रस्त्यावर भोस्ते जलालशहा मोहल्ला येथील क्वालिटी फॅक्टरी फोडून चोरांनी ३० हजार ६०० रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. खेड तालुक्यातील भोस्ते जलालशहा मोहल्ला येथील खेड ते अलसुरे मार्गावर क्वालिटी प्रॉडक्ट फॅक्टरी आहे. राहिल गोपीदास पिल्ले (३०) हे दि. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९:३० च्या सुमारास फॅक्टरीच्या दाराला कुलूप लावून बाहेर गेले. ते दि. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी रात्री ९:३० वाजता परतले.

या मुदतीत अज्ञात चोरांनी फॅक्टरीच्या मुख्य दरवाजाचे कुलूप फोडून आत प्रवेश केला. फॅक्टरीतील आतील कार्यालयाच्या दाराची कडी तोडून टेबलाच्या बरं डाव्या बाजूच्या ड्रावरमधील ३० हजार रोकड व पडदे लावण्याकरिता आणलेले ॲल्युमिनियमचे तीन पाईप ६०० रुपये किंमतीचे चोरुन गेले. असा एकूण ३० हजार ६०० किंमतीचा ऐवज चोरांनी चोरुन नेला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दाखल केली असून अज्ञात चोरांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.