कोरोनाने दोन्ही पालक गमावलेल्या रत्नागिरीतील बालकांना राज्य शासनातर्फे प्रत्येकी 5 लाखांची मदत

रत्नागिरी:-  कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते 5 लाख रुपयांची  मदत ठेव प्रमाणपत्र (एफडी) शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथे प्रदान करण्यात आले. आता पर्यंत पाच बालकांना अशा प्रकारे मदत करण्यात आली आहे. 

बालकांचे पुनर्वसन व त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्याची नक्की मदत होईल, असा विश्वास पालकमंत्री परब यांनी यावेळी व्यक्त केला. यावळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव,  जिल्हाधिकारी डॉ. बी.एन. पाटील, डॉ. इंदूराणी जाखड, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग,  जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी  रमेश काटकर, अध्यक्ष बाल कल्याण समिती ॲङ विनया घाग, जिल्हा बाल सरक्षण अधिकारी श्रीमती वीर आदि मान्यवंर उपस्थित होते. 

या योजनेत बालक व शासन यांच्या संयुक्त खात्यावर 5 लाख रुपये इतके अनुदान जमा झाला असून ते मुदतठेव स्वरुपात बालकांच्या वयाच्या  21 व्या वर्षापर्यंत ठेवण्यात येणार आहे. मुदतठेवीत गुंतविण्यात आलेली मुळ रक्कम व त्यावरील व्याज बालकाच्या वयाच्या 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतर बालकास मिळणार आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील दोन बालकांना तर लांजा तालुक्यातील तीन बालकांना झाला आहे.