कोरोना टेस्ट रिपोर्ट ऑनलाईन मिळणार

डॉ. सुतार यांनी तयार केली यंत्रणा

रत्नागिरी:- कोरोना तपासणी अहवाल आता रत्नागिरीत ऑनलाईन मिळणार आहे. जिल्हा रुग्णालयातील डॉ सुतार यांनी याबाबत सुसज्ज यंत्रणा तयार केली आहे. हा निर्णय शहरी भागातील लसीकरण केंद्रासाठीच घेण्यात आला आहे.

या यंत्रणेद्वारे आता आरटीपीसीआर व अँटिजेन रिपोर्ट ऑनलाईन मिळणार आहेत. हा ऑनलाईन रिपोर्ट सर्व कारणांसाठी वैध दस्तऐवज असेल अशी माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी दिली आहे. आजपासून याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार असून आज ज्यांची टेस्ट करण्यात आली आहे, त्यांचे रिपोर्ट ऑनलाईन पाहता येणे शक्य होणार आहे. काही जिल्ह्यात प्रवेशासाठी कोरोना चाचणी बंधनकारक आहे अशावेळेस किंवा होम डिलिव्हरीसाठी ही ऑनलाईन रिपोर्ट उपयुक्त ठरणार आहेत.