रत्नागिरी:- देवरुख कोंडगाव बाईंगवाडी येथील तरुणाच्या खुनाचा अवघ्या काही तासात उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. मयत तरुण याचा काका आणि अन्य दोघांनी मिळून हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी या तिघा संशयित आरोपीना अटक करून न्यायालयात हजर केले असता तिघांना 17 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. कोणत्या कारणातून हा खून करण्यात आला याचा शोध पोलीस घेत आहेत.
12 मे रोजी देवरुख पोलीस ठाणे हद्दितील कोंडगाव,बाईंगवाडी येथील शेवरपयाचे पाण्यात एक अज्ञात पुरुष जातीचे प्रेत मयत स्थितीत मिळुन आल्याची माहिती समजली होती. सदर बातमीच्या अनुषंगाने खात्री केला असता, दि.10 ते 11 मे या कालावधीत राकेश मनोहर सावंत (वय 36 वर्षे, रा. कोंडगाव) याच्या डोक्यात अज्ञात इसमांनी दगड मारुन, त्याचा खुन करुन त्याचे प्रेत कोंडगाव बाईंगवाडी येथे राहणारे मयताचे काका प्रविण तुकाराम सावंत यांचे घराचे समोरुन मळीतुन ओढत नेवुन कोंडगाव येथील शेवर पऱ्याचे पाण्यात पुरावा नाहीसा करण्याचे उद्देशाने टाकुन दिल्याचे निष्पन्न झाले.
या घटनेबाबत मयत याचे काका प्रविण तुकाराम सावंत (वय 53 वर्षे, रा. कोंडगाव, बाईंगवाडी, ता.संगमेश्वर) यांनी अज्ञातइसमाविरुध्द तक्रार दिली होती.सदरची माहिती प्राप्त होताच मा.पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांनी स्थानिकगुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन देवरुख येथे जावुन आरोपीयांचा शोध घेण्याबाबत सुचना दिल्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे अधिकारी व अंमलदार असे देवरुख येथे घटनास्थळी रवाना होवून घटनास्थळाची पाहणी केली. सदर वेळी त्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा श्री.श्रीनिवास साळोखे व देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मारुती जगताप हे हजर होवून त्यांचे स्टाफसह घटनास्थळाची पाहणी करुन आरोपी याचा ठावठिकाणा घेत होते.
वरील पोलीस पथकाने सदर घटनास्थळाची पाहणी केली असता, मयत यास स्थानिक आरोपी यांनीच ठार मारले असल्याबाबत संशय आल्याने त्यांनी मयत याचे आजुबाजुस रहाणारे तसेच त्याचे नातेवाईक यांचेकडे चौकशी सुरु केली. या चौकशीमध्ये यातील मयतास त्याचा चुलत भाऊ सुहास मोहन सावंत (वय-36 वर्षे, मयताचा काका) मोहन तुकाराम सावंत (वय 72 वर्षे) भुपेश चंद्रकांत सावंत (वय 39 वर्षे सर्व रा. कोंडगाव, बाईंगवाडी, ता.संगमेश्वर, जि. रत्नागिरी) यांनीच जीवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले. 11 मे रोजी संशयित आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. 12 मे रोजी सदर आरोपीना देवरुख स्थित न्यायालयात हजर केले असता, त्यांना दि.17 मे पर्यत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर करण्यात आलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोनि श्री. मारुती जगताप हे करीत आहेत.