कर्ला खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू

रत्नागिरी:- शहराजवळील कर्ला येथील खाडीत कालवे काढण्यासाठी गेलेल्या प्रौढाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार सकाळी 11 च्या सुमारास निदर्शनास आली. फहिम यासीन सोलकर (45, रा. न्यू कॉलनी, कर्ला, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोलकर हे शुक्रवारी सकाळी काजळी नदीच्या खाडी पात्रात कालवे काढण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. ग्रामस्थांनी ही घटना पाहिल्यानंतर त्यांच्या मृतदेह पाण्यातून काढून उपचारासाठी नातेवाईकांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला होता. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.