रत्नागिरी:- ऑनलाईन सातबारा उतारा देण्याची यंत्रणा काही तांत्रिक कारणामुळे ठप्प झाली असून, त्यामुळे शेतकर्यांच्या अडचणीत भर पडली आहे. मात्र हा बिघाड किरकोळ असून लवकरच ही सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे.
शेतकर्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून ऑनलाईन सातबारे आणि आठ-अ उतारा ऑनलाईन पद्धतीने देण्याचा निर्णय झाला होता. यामुळे ते मोबाईलवर किंवा कॉम्प्युटरवर सहजरित्या उपलब्ध होत होते. यामुळे शेतकर्यांची कामे झटपट होत होती. पण आता ही सेवा बंद करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसांपासून सातबाराची डिजिटल स्वाक्षरी सुविधा तलाठी कार्यालात सुरू असल्याच्या सूचना संकेतस्थळावर देण्यात येत आहेत. यामुळे अनेक अडचणी येत असून, शेतकर्यांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे शेतकर्यांना अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहेत.
काम सोपे व्हावे यासाठी शासनाने डिजिटल सातबारे मिळवण्यासाठी संकेतस्थळावर सेवा सुरू केली होती. असे असताना आता ही सेवा सध्या बंद करण्यात आली आहे. ऑनलाईन सातबारा सुविधा तांत्रिक
कारणामुळे ठप्प झाली असून लवकरच ही सेवा पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासकीय सुत्रांनी सांगितले.