एमआयडीसीत तरुणाची गळफास आत्महत्या

रत्नागिरी:- शहरानजीकच्या एमआयडीसी येथे राहत्या घरात एका २२ वर्षीय तरूणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी उघड झाली. ग्रामीण पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद करण्यात आली आहे.

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल शांताराम अलकट्टी (२२, रा. एमआयडीसी) असे गळफास घेतलेल्या तरूणाचे नाव आहे. अनिल याचा आईचे गेल्यावर्षी निधन झाले व अनिल सध्या एकटाच रहात होता. गॅरेज मध्ये तो काम करत होता, पण गॅरेजची नोकरी गेल्याने तो मिळेल तीथे काम करत असे. आई  गेल्याने व नोकरी सुटल्याने अनिल हा नेहमी टेंशन मध्ये होता. अनिल याचा मित्र दि.७ डिसेंबर रोजी सकाळी अनिलकडे गेला असता तो दरवाजा ठोठावत होता पण थोडावेळ झाला तरी अनिल दरवाजा उघडत नव्हता मित्राने दरवाजा तोडून प्रवेश केला व त्याला अनिल हा गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आला. अनिलच्या मावस भावाला मित्राने फोन करून कळवले व त्याचा मावस भाऊ देवेंद्र याने ग्रामीण पोलिसांना खबर दिली. अधिक तपास पोलीस हवालदार किशोर जोशी करीत आहेत.