एमआयडीसी येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी:- शहरातील एमआयडी येथे बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या प्रौढाला उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बच्चनसिंग (रा. प्लॉट नंबर ए-१०, एमआयडीसी रत्नागिरी, पुर्ण नाव गाव माहित नाही) बच्चनसिंग हे खबर देणार यांच्या प्लॉट नं ए-१० येथे बेशुद्ध अवस्थेत आढळले त्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात खबर दिली. उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.