आंब्याच्या झाडावरून पडून तरुण जखमी

रत्नागिरी:– तालुक्यातील कळझोंडी येथे आंब्याच्या झाडावरुन पडून तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवार 1 मार्च रोजी सकाळी 11 वा.घडली.

इंद्रसेन छोटेलाल चव्हाण (19, रा.कळझोंडी, रत्नागिरी) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तो कळझोंडी येथील आंबा कलमाच्या बागेत एका आंब्याच्या झाडावर चढून साफसफाई करण्याचे काम करत होता. त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो खाडी पडून जखमी झाला. त्याच्या सहकार्‍यांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारांसाठी त्याला सोमवार 4 मार्च रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याठिकाणी उपचार घेतल्यानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यामळे त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.