असुर्डे पुलावरून कार कोसळून एक ठार, दोघे गंभीर

खेड:- मुंबई-गोवा महामार्गावर असुर्डे पुलावरून ईको कार ( MHO1-BF-5291) नदीत कोसळून एक जण जागीच मृत्युमुखी पडला तर दोन जण जखमी झाले आहेत. हा अपघात गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास झाला.

या अपघातातील इको कार चालक आपल्या ताब्यातील कार घेऊन जात असताना असुर्डे  रस्त्याच्या डाव्या बाजूला पुलावरून खाली पडून अपघात झाला. त्यामध्ये अरुण लक्ष्मण घोगले (67 राहणार मुंबई) हे जागीच मयत झाली असून गाडीतील चंद्रशेखर गोपाळ कदम (70) व रतन  रमेश कहार (20)  दोघे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी डेरवण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अपघाताची नोंद पोलिस ठाण्यामध्ये करण्यात आली आहे.