मंडणगड:- मंडणगड तालुक्यातील एका गावातील नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मंडणगड पोलीस स्थानकात 28 जून 2021 रोजी गुन्हा नोंद झाला आहे.
यानंतर पोलीसांनी तात्काळ कारवाई करत संशियत आरोपी आशिष विजय बाईत वय (19, रा. माहु ) यास ताब्यात घेतले आहे. त्याला काल 29 जून 2021 रोजी खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात पिडीत बालिकेच्या आईने मंडणगड पोलीस स्थानकात दिलेल्या फिर्यादीतील माहीतीनुसार 27 जुन 2021 रोजी दुपारी 4.00 ते 4.15 वाजण्याचे दरम्यान फिर्यादी यांच्या जवळच्या नातेवाईकाने त्यांच्या नऊ वर्षांचे मुलीस घरात कोणी नसताना पाठ दाबण्याच्या बहाण्याने बोलावले व घराचा दरवाजा बंद करुन तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. या तक्रारीनंतर मंडणगड पोलीस स्थानकात संशयितांविरोधात भा.द.वि. कलम 376 (अ) व (ब,) बाल लैंगिक अत्याचार अधिनियम 2012 चे कलम 4,6, 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक सुशांत वराळे करीत आहेत.