राजापूर:- अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या मनोज मधुकर राऊत (रा.ससाळे, राजापूर) याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणातील पिडीत मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असताना मनोज मधुकर राऊत याने पिडीत मुलीचा पाठलाग करत विनयभंग केल्याने त्याच्याविरोधात राजापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी होवून सरकारी पक्षातर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. या 9 साक्षीदारांनी सरकार पक्षाच्यावतीने साक्षी दिलेल्या होत्या. विशेष पोस्को न्यायालयाच्या न्यायाधीश वैजयंतीमाला राऊत यांनी अपुऱ्या पुराव्याच्या आधारे आरोपी मनोज राऊत याची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपीच्या वतीने ॲड.मिलींद चव्हाण यांनी काम पाहिले.