अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा

दापोली:- दापोली तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचा तरुणाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडली. अश्पाक लियाकत पावसकर (४१, दापोली) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सोमवारी त्याला अटक करुन न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. अश्पाक याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम ७४,७५,७९,३५१ (२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.