अल्टो कारची पादचाऱ्यासह दुचाकीला धडक

खेड:- भरणेतील मध्यवर्ती ठिकाणी अल्टो कारने एका पादचाऱ्यासह दुचाकीस धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी राज सुनील भोसले (रा. शिक्षक कॉलनी भरणे) याच्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर घटनास्थळावरून पलायन केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला.

बबन लक्ष्मण मुकणे (३५ रा. पुरे बुद्रुक आदिवासीवाडी), राजेंद्र विष्णू भोसले (६२ एसटी डेपोसमीर, खेड) बबन मुकणे हे पुरे बुद्रुक येथे जाण्यासाठी भरणे येथे एसटी बसची वाट बघत बसले होते, याचवेळी अल्टी कार ( एम.एच. ४३ आर. ८४६०) घेऊन येणाऱ्या राज भोसले याने त्यांना धडक दिली. याचदरम्यान, दुचाकीलाही (एम.एच. ०८ एम.के. ९४५५) ग्रडक देत पलायन केले,

जागरुक नागरिकांनी त्याला शिताफीने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. दोघांच्या दुखापतीसह दुचाकीचे नुकसान केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.