रत्नागिरी:- अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभिर जखमी झालेल्या दुचाकी स्वार प्रौढाचा उपचारांदरम्यान सोमवार 25 एपिल रोजी सायंकाळी 5.15 वा. उपचारांदरम्यान कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवार 16 मार्च रोजी रात्री 8.20 वा.मारुती मंदिर ते नाचणे विष्णूनगर येथील रस्त्यावर घडली होती.
संदिप यशवंत झगडे (52, मुळ रा.बसणी मधलीवाडी सध्या रा.साळवी स्टॉप,रत्नागिरी) असे उपचारांदरम्यान मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. 16 मार्च रोजी ते आपल्या ताब्यातील (एमएच- 08-वाय- 4680) घेउन मारुती मंदिर ते नाचणे असे जात होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून येणार्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक देत अपघात करुन घटनास्थळावरुन पळ काढला होता. या अपघातात संदीप झगडे यांच्या डोक्याला व शरिराला गंभिर दुखापत झाल्यामुळे त्यांना प्रथम जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार करुन अधिक उपचारांसाठी कोल्हापूरला नेण्यात आले होते. त्याठिकाणी सीपीआर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु असताना सोमवार 25 मार्च रोजी त्यांचा मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात 4 एप्रिल रोजी नोंद करण्यात आली आहे.