खेड:- तालुक्यातील लवेल येथे दि . १ जून रोजी रात्रीच्या सुमारास मुंबई – गोवा महामार्गावर बँक ऑफ इंडीया शाखा घाणेखुंट समोर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली होती . या अपघातात एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला होता . या प्रकरणी पोलिसांनी बेदरकारपणे चुकीच्या बाजूने दुचाकी चालवत घेऊन आलेल्या दुचाकीस्वार विरोधत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार , सदानंद मधुकर जोयशी हे घरी लवेल येथे मोटारसायकल वरून येत असताना मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बँक ऑफ इंडीया शाखा घाणेखुंटचे समोरील रस्त्यावर घाणेखुंट बाजूकडन चुकीच्या दिशेने येणारा मोटारसायकल चालक शहिनूर बबलू मिया हक याने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल ( एम एच ०८ ए जे ३७५८ ) ने जोयशी यांच्या ताब्यातील मोटारसायकल ( एम एच ०८ एस . २४२६ ) ला समोरुन जोरात धडक दिली . या अपघातात सदानंद जोयशी यांचे डोक्याला गंभीर दुखापत झाली तर शहीनूर याच्या दोन्ही हाताला दुखापत झाली . या अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी पोलिसांनी शहिनूर बबलू मिया हक , ( वय २४ वर्ष , रा . पत्तचिरा कोच बिहार वेस्ट बंगाल , सध्या रा . धामणदेवी ता . खेड जि . रत्नागिरी ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.